शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडपा करिता मंडप परवानगी व शुल्क माफ करण्यात यावे, असे आदेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना दिले आहे.
सदर पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करिता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुव्यवस्थितपणे पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सध्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याकरिता परवानगीसाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत एक खिडकी योजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कल्याण-डोंबवली महापालिकेच्या धर्तीवर मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
तरी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना क्षेत्रीय कार्यालयामार्फत एक खिडकी योजनेतून मंडप उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळणे संबंधित तसेच शुल्क माफी बाबत संबंधितास योग्य ते निर्देश द्यावेत असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्तांना दिले आहे.