शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मे. क्रिसील रिस्क अन्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागारची निविदा रद्द करण्यात यावी,असे मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड मनपाचे विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, यी समिती विषय क्रं २७ मे. क्रिसील रिस्क अन्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागार याची निविदा र रुपये १,७००००००/- स्थायी चे पाशवी बहुमताचे जोरावर मजुंर देणेते आलेली आहे. परुंतु सदर निविदा धारकाची या पुर्वीची कामाची गुणवत्ता योग्य नाही. तसेच सल्लागार कंपनी बड्या राजकीय नेत्याच्या संबधीत आहे , त्यामुळे पुण मनपा मध्येही सल्लागार कंपनीच्या नेमणुकीला विरोध झालेला आहे. विषय क्रं २७ मध्ये वरील कंपनीची मनपाला कोणत्या कामासाठी सल्लागार करिता नेमणुक होणार आहे हे ही स्पष्ट होत नाही.त्यामुळे आपणांस विनंती आहे की, मे. क्रिसील रिस्क अन्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागारची योग्य ती चौकशी करुन निविदा रद्द करणेत यावी यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही. असे ही दिलेल्या निवेदनात राजू मिसाळ यांनी म्हंटले आहे.
सदर निवेदनावर नगर सदस्या पोर्णिमा सोनवणे, नगर सदस्या सुलक्षणा धर, नगर सदस्य राजु बनसोडे, नगर सदस्य प्रविण भालेकर यांच्या सह्या आहेत.