शबनम न्यूज | पिंपरी
भाजप नगरसेविका आशा शेडगे यांनी आंदोलन करीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात शाई फेकून निषेध व्यक्त केला या घटनेनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबत अकरा महिलांनाही त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल या घटनेवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी या प्रतिक्रिया देताना सांगितले की नगरसेविका आशा शेंडगे यांनी मोघम तक्रारी करत त्यांच्या प्रभागातील स्मार्ट सिटी चे काम अडविले होते, काम वेळेत आणि लवकर पूर्ण केले जाईल असे त्यांना कळविले होते असे असतानाही त्यांनी शाई घेऊन आयुक्त कार्यालयात येऊन शाई फेकली त्यांना काय सिद्ध करायचे होते हे माहीत नाही, त्यांना चर्चा करायची नव्हती, दुसरेच काहीतरी करायचे होते,परंतु कोणत्याही चुकीची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
नगरसेविका आशा शेडगे यांनी शाई आयुक्त कार्यालयाच्या नाम फलकावर फेकून नुसतीच स्टंटबाजी केली असल्याचे आता समोर आले आहे.
भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनीही नगरसेविका आशा शेंडगे यांनी केलेल्या कृत्याचा निषेध केलाआहे त्यांनी आयुक्तांशी चर्चा सामंजस्याने करायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती केली नाही, असे कृत्य करणे चुकीचे आहे समजुतीच्या मार्गानेही प्रश्न सुटतात, शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करता आले असते त्यांनी ते केले नाही भाजप वतीने त्यांच्या या कृत्याचा निषेधच आहे असे अमोल थोरात यांनी सांगितले
तसेच भाजप नगरसेविका आशा शेडगे यांनी आयुक्तांच्या नामफलकला काळे फासले या प्रकरणाचा सत्ताधारी भाजप वतीने सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी निषेध केला आहे, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून या घटनेचा निषेध केला, तर भाजपमधील पक्षांतर्गत भांडणे पक्षातच मिटवावेत प्रशासनास लक्ष करू नये अशी टीका शिवसेनेने केली आहे, या घटनेचा निषेध राष्ट्रवादीनेही केला आहे .