शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भरधाव टेम्पो चालकाच्या धडकेत दुचाकीस्वार उडून दुसरा लेन वर पडला. त्यानंतर दुसऱ्या टेम्पो खाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडला.
लक्ष्मण गोपाळ दळवी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या बाबत बाजीराव हिरामण शेटे (वय 47 रा. सावरदरी तालुका खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र लक्ष्मण दळवी चौकाकडून वासुली कडे जात होते. सावरदरी येथे आल्यानंतर आरोपी टेम्पो चालकाने भरधाव वेगात टेम्पो चालून अचानक वळवला. त्यात दळवी यांच्या दुचाकीला टेम्पोची जोरात धडक बसली व ते उडून दुसऱ्या लेन वर पडल्या नंतर त्या दुसऱ्या लेन वरून जाणाऱ्या एका टेम्पो खाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला.