काही नागरिकांच्या असहकार्यामुळे पोलीस संरक्षणात काम सुरू
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गेली सहा महिन्यापासून क्रांतीसुर्यनगर मधील महिलांची ड्रेनेज चोकअप,दुर्गंधी व आजार यामुळे नवीन ड्रेनेज लाईन करून देण्यासंबंधी ची मागणी होती तथापि तेथील काही नागरिकांकडून या कामासाठी विरोध होत होता दोन चार वेळा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु काम नागरिकांकडून थांबविण्यात आले.
यासंदर्भात उपअभियंता जलनिस्सारण विभाग यांच्याशी संपर्क साधून या बाबतीत आपल्याला काय पर्याय काढता येईल व क्रांतीसुर्य नगरमधील मागच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवता येतील याबाबत चर्चा केल्यानंतर पोलिस यंत्रणेचा या कामासाठी मदत घेण्याची गरज असल्याचे जलनिस्सारण विभागाने सुचविले. त्यानुसार पोलिस संरक्षणात गेल्या दहा दिवसांपूर्वी या ठिकाणी काम सुरू करण्यात आले.
गल्ली अरुंद असल्यामुळे येथे काम संथगतीने आहे पण नियमित चालू आहे अजूनही तीन आठवडे हे काम पूर्ण होण्यासाठी जातील.
पण गेली पंधरा वर्षांपूर्वीची ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू झाल्यामुळे व लवकरच ड्रेनेज चोकअप च्या दुर्गंधीच्या,रोगराईच्या समस्येतून मुक्त होऊ या आशेने नागरिक या ठिकाणी खुश आहेत.
आणि आता या कामाचे महत्त्व पटल्याने सर्व नागरिकांचे या कामाला सहकार्य मिळत आहे व नगरसेविका प्रियांका बारसे यांचे आभार मानत आहेत.