शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
दिल्ली , मुंबई साकीनाका पुणे शहर पिंपरी-चिंचवड व देशात विविध ठिकाणी होत असलेल्या महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे वाढते अत्याचार थांबविले पाहिजे तसेच गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी केली आहे या वाढत्या अत्याचाराविरोधात पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले तसेच अल्पसंख्यांक सेल वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
दिल्ली पोलीस महिला कर्मचारी साबिया सैफी ला न्याय मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयावरपिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) तर्फे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन घेण्यात आले.
तसेच दिल्ली,मुंबई साकीनाका ,पुणे शहर, आनंद नगर पिंपरी चिंचवड व भारतातील महिलांवर होणारे सामूहिक अत्याचार व अल्पसंख्यांक समाजावर होणारेअन्याय विरोधात पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालय आकुर्डी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागा च्या वतीने देशाचे राष्ट्रपती मा.रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनामध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस तर्फे बलात्कार करणाऱ्या आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्वरित त्यांना फाशीची शिक्षा व त्यापेक्षाही कठोर शिक्षाची तरतूद राज्य घटनेत करण्यात यावी अशी विनंती पत्र द्वारे करण्यात आली.
याप्रसंगी मौलाना आबीद रजा, बिशप मायकल राज नाडर, पा.बन्यामीन काळे, रेव्ह.सुधीर अवचिते, मौलाना अफिफ रजा,ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सदस्य माजी नगरसेविका सौ. निगार ताई बारस्कर, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या माजी महिला अध्यक्षा सौ. शामला ताई सोनवणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र सिंग वालिया, शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस मयूर जैस्वाल, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, प्रवक्ते गौरव चौधरी, कमाल खान, जावेद शाहा, फय्याज शेख, हर्षद ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते सालार भाई शेख इम्रान बेग, फिरोज शेख ब्र.संदेश चोपडे, ब्र.डेव्हिड काळे (महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद),संदेश कोळगे. उपस्थित होते. आभार पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष विशाल कसबे यांनी मानले.