शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
डी वाय पाटील कॉलेज ,ऑप्टोमेट्री विभागाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या युवासेना विद्यापीठ कक्षाकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार कोविड परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी 1 जून 2021 रोजी झालेल्या पुनरावृत्ती परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून ऑप्टोमेट्री विभागाच्या विद्यार्थ्यांना विभागप्रमुखांकडून आश्वासन देण्यात आले की त्यांच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसह ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल, तसा विभागप्रमुखांचा संदेश देखील विद्यार्थ्यांकडे आहे. परंतु आता जेव्हा विद्यार्थी परीक्षा घेण्यासंदर्भात विभागाला विनंती करत आहेत तर विभाग परीक्षा घेण्यास नकार देत आहे आणि या कारणास्तव विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव व कॉलेज कक्ष प्रमुख वरुन सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाने निवेदन दिले. काॅलेज संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे की, परीक्षा घेतली जाईल आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही अशी हमी देखील दिली.
निवेदन विद्यापीठ कक्षाचे सचिव निखिल येवले, सहसचिव गौरव आसारे, सदस्य श्रीथ लांडे, काॅलेज कक्ष पिंपरी प्रमुख आशिष बाबर आणि शंतनु येवले यांनी डाॅ. मित्रा मॅडम यांना दिले आहे.