पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते व विद्यमान नगरसेवक .कैलास ( बाबा ) बारणे यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील अपक्ष गटनेते नगरसेवक कैलास बारणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
बरेच दिवसापासून चर्चा होती नगरसेवक कैलास बारणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार , मागील काही दिवसा पूर्वी कैलास बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर कैलास बारणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते परंतु कैलास बारणे यांनी त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश कडून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
नगरसेवक कैलास बारणे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये थेरगाव परिसरात अपक्ष म्हणून 2017 च्या निवडणुकीत निवडून आले होते निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत भूमिका बजावली. परंतु काही महिन्यापासून नगरसेवक कैलास बारणे हे राष्ट्रवादी च्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होते त्यांनी वेळोवेळी अजित दादा पवार यांची भेट घेतली होती यावरून राष्ट्रवादी मध्ये जाणार ही चर्चा होती त्यानुसार त्यांनी आज राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केला
अपक्ष गटनेते कैलास (बाबा) बारणे यांचा आज राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार* यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष कार्यलय,मुंबई येथे झाला, प्रसंगी *राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे,* *संतोष नागुभाऊ बारणे* *(मा.विरोधी पक्षनेते,पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा), अभयशेठ मांढरे* ( *अध्यक्ष : अजित प्रतिष्ठाण ),सतीशदादा दरेकर (राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी, मा.नगरसेवक), ऋषिकेश रेवणनाथ काशिद (अध्यक्ष : कुंभार समाजोन्नती मंडळ,पिं.चिं.शहर जिल्हा, योगेश साळुंखे ,प्रविण बारणे, शहाजी लोखंडे,* *अक्षय बारणे,* आणि *तुषार मोरे* उपस्थित होते.