शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवीत महापालिका काबीज केली त्यावेळी अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजप पक्षात गेल्याने राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली परंतु आता राष्ट्रवादी मध्ये भाजप समर्थक व भाजपमधील अनेक नगरसेवक प्रवेश करीत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय परिस्थिती आता बदलणार असल्याची चर्चा होत आहे.
भाजप नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे तसेच भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांच्या पाठोपाठ आता भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलत असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होईल हा येणारा काळ सांगेन.
भाजप पक्षाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील वाढत असलेला भ्रष्टाचार निवडणुकीत अडचणीचे ठरणार आहे भाजप सत्ताधारी पक्षाला महापालिका पुढील काळात काबीज करता येणार नाही अशी चर्चा सर्वत्र होत आहे मागील साडेचार वर्षात भाजप पक्षाकडून कोणतेही विकासाचे असे काम झालेले नाही भ्रष्टाचार वाढला आहे, मागील महिन्यात स्थायी समिती सभापती लाच प्रकरणात अडकले त्यांना एसीबी कडून अटक करण्यात आली ते आता जामिनावर आहेत हा भाजपला मोठा धक्का असून , हे होत असतानाच भाजप नगरसेविका आशा शेडगे यांनीही मनपा आयुक्तांच्या कार्यालयात शाई फेकल्याप्रकरणी त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशा घटनांमुळे भाजप शहरात बदनाम झाली आहे अशीही चर्चा होत आहे त्यामुळे येत्या काळात भाजपला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
तसेच भाजप मधून राष्ट्रवादीत इन्कमिंग वाढली असल्याने भाजप पक्ष अडचणीत आला असल्याची सर्वत्र चर्चा आहे
महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहे.हे निश्चित