शबनम न्यूज | पुणे
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ची नवनियुक्त कार्यकारिणीची पहिली बैठक आज संपन्न झाली या बैठकीत जुबेर बाबू शेख यांची राष्ट्रवादी पुणे शहर चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्तीचे पत्र पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
पुणे महानगरपालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्ष पुणे शहरात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे.
जुबेर बाबू शेख यांची नियुक्ती पुणे शहर चिटणीस पदावर झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि पक्षाने दिलेली पुणे शहर चिटणीस पदाची जबाबदारी मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेल व पक्ष मजबूत करण्यास माझे संपूर्ण योगदान असेल तसेच पुणे महानगरपालिकेत भविष्यकाळात राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता स्थापन करण्यास माझे शंभर टक्के योगदान असेल पक्षाने दिलेल्या जबाबदारी बद्दल मी पक्षाचे शतशः आभार व्यक्त करतो
यावेळी माजी आमदार कमलताई ढोले, माजी आमदार कुमारभाऊ गोसावी, पुणे मनपाच्या विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, माजी उपमहापौर दीपक मानकर ,माजी स्थायी समिती सभापती .सदानंद शेट्टी यांच्यासह शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रांचे अध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष व असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित ही बैठक संपन्न झाली.