शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या ७ व्या दिवशी शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळून एकूण १५ हजार ११७ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी
आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या ७ व्या दिवशी अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ९२२, ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये ४ हजार ४२२, क क्षेत्रीय कार्यालयामध्ये १ हजार ७७०, ड क्षेत्रीय कार्यालयामध्ये १ हजार ५६०, इ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ९६३, फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ८३७, ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये २ हजार ७२, ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये २ हजार ५७१ श्री गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे महानगरपालिकेच्या वतीने विविध खाणींमध्ये विधीवत विसर्जन करण्यात आले.