शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
दी इंटरनॅशनल चॅलेंज ऑफ मलेशिया वतीने घेण्यात आलेल्या रेन फॉरेस्ट चॅलेंज या थरारक स्पर्धेत पुणे येथील दौलत चौधरी यांना फस्ट रनरअप फॉरेस्ट चॅलेंज या दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
ही स्पर्धा सर्वात जास्त थरारक असते. जगभरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दऱ्याखोऱ्यातून, जंगलातून, चिखलातून, ट्रेकिंग करत पार पाडली जाते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना अत्यंत जिगरबाज पणे स्पर्धा पार पाडावी लागते. या स्पर्धेत पुण्याच्या दौलत चौधरी यांनी दुसऱ्या क्रमांकावर पारितोषिक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत पार पडली. मुंबई दिल्ली पंजाब केरळ गोवा अरुणाचल प्रदेश कर्नाटक असे एकूण 20 टीम यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्वांना मात देत पुणे येथील दौलत चौधरी यांनी पारितोषिक पटकाविले. त्यांना डिझेल कॅटेगरीमध्ये गोव्याचे महसूल मंत्री जेनिफर मोनासरीटे यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. पुणेकरांसाठी ही अत्यंत गौरव पूर्वक अनुभव देणारी स्पर्धा ठरली.