मुंंबई | शबनम न्यूज
खानांचा बॉलीवुडमध्ये दबदबा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त दर काही दिवसानंतर त्याचा पुरावा तेवढा समोर येतो. आता हेच बघा, सलमान खाननं बिग बॉस होस्ट करण्यासाठी जे पैसे घेतल्याचं वृत्त आहे. त्यानं सर्वसामान्यांचं डोकं चक्रावून जाईल. गेल्या 15 वर्षापासून सलमान खान बिग बॉस होस्ट करतो आणि
त्यासाठी तो तगडी फीसही वसूल करतो. त्याची चर्चाही होते. पण येणाऱ्या बिग बॉसच्या एडीशनसाठी त्यानं जी रक्कम घेतलीय. त्यात 1 कोटी रुपये किंमतीच्या लँड रोव्हर्सच्या अलिशान अशा कमीत कमी 350 गाड्या तो सहज घेऊ शकतो. म्हणजेच 15 सिजनसाठी सलमान खाननं 350 कोटी फी चार्ज केल्याचं वृत्त आहे.
Advertisement