मुंबई – कोरोना महामारीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना मदत करणारा चित्रपट अभिनेता सोनू सूद याने २० कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप प्राप्तिकर खात्याने केला आहे. सोनू सूद याच्या निवासस्थानासह मुंबई, लखनौ आणि दिल्लीतील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापे मारले होते. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. आता, सोनू सूदच्या संपत्तीत 250 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. सोनूने ही देगणी संपूर्ण भारतात दिली आहे. सध्या, सातत्याने सोनू सूदच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यात येत आहे. इन्कम टॅक्स विभागाने आत्तापर्यंत 28 जागांवर धाड टाकली आहे. त्यामध्ये, मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूर आणि गुरुग्राम यांचाही सहभाग आहे. सोनू सूदविरुद्ध करण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी चौकशी आहे.