शबनम न्यूज | पुणे
मोरयाचा जयघोष, ध्वजाची सलामी, शंखनाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भंडाऱ्यांची उधळण अशा मंगलमय वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’ना निरोप देण्यात आला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांचे विसर्जन दुपारी २:३५ वाजता मंडपात खास सजवलेल्या कुंडामध्ये झाले. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement