शबनम न्युज | मावळ
मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण अभियानाअंतर्गत वराळे येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. वराळे गावातील श्री हॉस्पिटल लसीकरण केंद्रास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली.
Advertisement
लसीच्या उपलब्धतेनुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यावर भर दिला असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी दिली .लसीकरणाबाबत जनजागृती झाली असल्याने लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.या लसीकरण मोहिमेस वराळे गावातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
Advertisement
या केंद्रावरील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी व बालाजी तरुण मंडळाने सामाजिक भान जपत नियोजनबद्ध विक्रमी लसीकरण केले त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आमदार सुनील शेळके यांनी आभार व्यक्त केले आहे.
Advertisement