शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
१७ सप्टेंबर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस भाजपा लाभार्थी सन्मान दिवस म्हणून प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपा लाभार्थी सन्मान दिवस साजरा केला जात आहे .
पंतप्रधानांनी देशाला प्रगतीपथावर नेताना अनेक योजना आणल्या. त्या यशस्वीपणे राबविल्या.
मोफत कोरोना लसीकरण , पंतप्रधान आवास योजना, गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप,उज्वला गॅस योजना,आयुष्यमान भारत या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना “लाभार्थी सन्मान प्रमाणपत्र ” दिले जाऊन भा.ज.पा.व प्रियांका प्रवीण बारसे जनसंपर्क कार्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळ लक्षात घेऊन २५ महिलांचा एकत्रित कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी घेतलेला असून यापुढील प्रमाणपत्र प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयात मिळतील .
गवळीनगर प्रभागामधील नागरिकांनी केंद्रशासनाच्या वरिला योजनांचा लाभ घेतला असेल त्यांनी प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा व आपले सन्मानपत्र घेऊन जावे तसेच आपले शेजारी मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना या योजनांबाबत माहिती द्यावी असे आवाहन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केले आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्य शासन केंद्र शासन यांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांना लाभ मिळवुन देणे हेच माझे मूळ कर्तव्य असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केले.