शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील अखिल थेरगाव युवा मंच यांच्या माध्यमातून थेरगाव मधील नागरिकांसाठी ऑनलाईन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष, प्रभाग क्र. 24, महिला आघाडी, भाजप करिश्मा सनी बारणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या ऑनलाइन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास स्मार्ट टीव्ही, द्वितीय क्रमांकास ओव्हन, तृतीय क्रमांकास गॅस शेगडी, चतुर्थ क्रमांकास मिक्सर, पाचवा क्रमांकास ज्यूसर असे आकर्षक बक्षीस भेट देण्यात येणार आहे. व प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
- सदर स्पर्धेसाठी नियम व अटी
1) स्पर्धकांनी आपल्या गौरी गणपतीच्या घरगुती सजावटीचा स्वतंत्र फोटो, व्हिडिओ (एक मिनिटाचा असावा) व सजावटी सोबत सेल्फी खालील नंबर वर पाठवावा.
2) परीक्षणासाठी परीक्षक फोन करून आपल्या घरी भेट देतील. दिनांक 14 तारखेपर्यंत दुपारी 12 नंतर आलेले व्हिडिओ बक्षीसपात्र नसतील.
3) स्पर्धकांनी संपूर्ण नाव व पत्ता संपर्क क्रमांकावर पाठवावा.
4) स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल.
5) अंतिम निर्णय आयोजकांचा असेल.
6) अंतिम निकालाची दिनांक अगोदर कळविली जाईल.
असे या स्पर्धेचे नियम व अटी असणार आहेत.
सदर स्पर्धा करिश्मा सनी बारणे जनसंपर्क कार्यालय, गव्हाणे हॉस्पिटल समोर, शेल पेट्रोल पंपा शेजारी, गुजर नगर थेरगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता 8888772766 / 8285661212 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करिश्मा सनी बारणे यांनी केले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ही करिश्मा सनी बारणे यांनी केले आहे.