शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते, तसेच कामगार नेते अमोल कलाटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गजानन चिंचवडे हे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक विलास मडिगेरी, भाजप शहर प्रवक्ता अमोल थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते.