शबनम न्युज | पुणे
पुणे विभागातील 19 लाख 28 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 83 हजार 480 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 731 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.24 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 33 हजार 549 रुग्णांपैकी 11 लाख 7 हजार 827 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार 963 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.73 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 46 हजार 860 रुग्णांपैकी 2 लाख 37 हजार 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 606 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 773 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 205 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 620आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 443 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 214 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 1 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 228 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 855 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 551 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 541 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 438 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 779, सातारा जिल्ह्यात 255, सोलापूर जिल्ह्यात 238, सांगली जिल्ह्यात 120 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 693 आहे. पुणे जिल्हयामध्ये 790, सातारा जिल्हयामध्ये 385, सोलापूर जिल्हयामध्ये 261, सांगली जिल्हयामध्ये 166 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 91 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 66 लाख 23 हजार 956 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 83 हजार 480 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.