युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ही सामाजिक उपक्रम
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक सचिन भोसले तसेच युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवा सेने वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये दापोडी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला, त्याचप्रमाणे अनाथाश्रमात अन्नदान व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे निलेश हाके यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की पिंपरी युवासेना वतीने विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्तच नाहीतर आम्ही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देत असतो सामान्य नागरिकांना अनेक प्रकारची मदत पिंपरी युवासेना वतीने आतापर्यंत करण्यात आली आहे .
यावेळी प्रमोद गायकवाड, रवी नगरकर, अविनाश जाधव, अभिजित कांबळे, राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनाथाश्रमातील अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान झाल्याचे निलेश हाके यांनी सांगितले.