शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात आमदार सुनील कांबळे यांच्याशी आमचे शबनम न्यूज चे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.
ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबधीत महिला अधिकाऱ्यानी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणरडया भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटाचे संभाषण झाले. त्यानंतर आता त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.