शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरात आगामी महापौरही शिवसेनेचाच असेल. असे सांगत कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असेही आवाहन केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेना घासून नाहीतर ठासून येणार, पिंंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर झाला नाही, ही आमची खंत आहे. पण येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, ही अपेक्षा ठेवली तर काय चुकलं? असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री शिवसेनेचा, महापौर देखील शिवसेनेचाच असेल. येत्या निवडणुकीसाठी आपण स्वबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे. सोबत आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका एकट्याने लढण्याचे आवाहन केले.
राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, तर येणा-या निवडणूकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन केली आहे. येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकञ आलोत ठीक तुमच्या बरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवू.
अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी आमचे ऐकले पाहिजे .पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील आमचं ऐकत नाही, अजितदादा आमचं ऐकत जा नाहीतर गडबड होईल नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले आहेत. असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोसरीमध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात लगावला .
यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, शहर प्रमुख नगरसेवक सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक राहुल कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.