शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील,श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ येथील शिक्षिका,प्रतिमा अरुण काळे यांना दिल्ली नोयडा येथे १७ सप्टेंबर २०२१ रोजी सुदर्शन न्यूज चॅनेल भवन,नोएडा( उत्तर प्रदेश) येथे कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार सुदर्शन न्यूज चॅनेलचे मुख्यसंपादक सुरेश चव्हाण के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार सरपंच सेवा संघ व सरपंच माझा चॅनेल तसेच सुप्रसिद्ध न्यूज चॅनेल सुदर्शनतर्फे आयोजित करण्यात आला होता.कोरोना काळात आपल्या परिसरात,शैक्षणिक क्षेत्रात, साहित्यक्षेत्रात, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातून प्रतिमा अरुण काळे यांची निवड करण्यात आली होती.या प्रसंगी कोरोनायोध्दा पुरस्कार म्हणून स्मुर्ती चिन्ह,ट्राफी व प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच सेवा संघांचे पुरुषोत्तम घोगरे, सरपंच न्यूज चॅनलचे रामनाथ बोराडे, संपर्कप्रमुख राहुल उके व महाराष्ट्रातील कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे विविध जिल्ह्यातील सरपंच,डॉक्टर्स,शिक्षक,उद्योजक,उद्योजिका उपस्थित होते.