शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 19 लाख 33 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 87 हजार 224 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 753 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 35 हजार 634 रुग्णांपैकी 11 लाख 10 हजार 111 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.75 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 47 हजार 468 रुग्णांपैकी 2 लाख 37 हजार 952 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 258 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 390 रुग्णांपैकी 1 लाख 94 हजार 18 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 413आहे. 4 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 757 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 657 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 840 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 975 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 501 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 185 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 686, सातारा जिल्ह्यात 184, सोलापूर जिल्ह्यात 187, सांगली जिल्ह्यात 98 तर कोल्हापूर जिल्ह्यात 30 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 531 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 35, सातारा जिल्हयामध्ये 96, सोलापूर जिल्हयामध्ये 208, सांगली जिल्हयामध्ये 137 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 55 रुग्णांचा समावेश आहे.