शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
डी आय सी स्कूल निगडी प्राधिकरण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडी आणि पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा व द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला.
.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी डी एफ चे राज्याचे अध्यक्ष विजय बहाळकर यांची निवड करण्यात आली. तर प्रमुख अतिथी यांनी निरीक्षक म्हणून टी डी एफ चे राज्य कार्याध्यक्ष जी के थोरात आणि टी डी एफ चे विभागीय सचिव के एस ढोमसे उपस्थित होते. याशिवाय पुणे जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले, जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे जिल्हा पीडीएफ चे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे ,पुणे जिल्हा पीडीएफ चे सचिव राजेंद्र पडवळ ,मंचर कॉलेजचे उपप्राचार्य श्री चासकर सर व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रेय अरकडे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडी व पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवृत्ती काळभोर यांची तर कार्याध्यक्षपदी महादेव फपाळ ,सचिवपदी संजीव वाखारे आणि कोषाध्यक्षपदी रफीक इनामदार यांची एकमताने निवड करण्यात आली
तर पिंपरी चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पितळीया यांची तर कार्याध्यक्षपदी रामनाथ खेडकर, सचिव पदी किरण आढागळे व कोषाध्यक्षपदी शशिकांत घुले यांची एकमताने निवड करण्यात आली
पाहुण्यांची ओळख राजेंद्र पितळीया यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव फपाळ यांनी केले.