शबनम न्युज | मनोरंजन
“ओ शेठ” या गाण्याचे’कॉपीराईट’च्या मुद्यावरून तीन जणांमध्ये वादाची ठिणगी पडली अन् हा वाद इतका विकोप;ला गेला की थेट हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे महामंडळाच्या लवादासमोर मिटला.
प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. हे गाणे यूट़्यबवरून काढून टाकल्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांकडे धाव घेतली होती. मनसेचे रमेश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या माध्यमातून महामंडळाच्या लवादासमोर हा वाद चर्चेने सोडविण्यात आला.
याप्रसंगी उमेश गवळी म्हणाले, मागील काही दिवसांपासून आमच्या तिघांमध्ये संवाद नव्हता. त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण होऊन परस्परांविषयी चूकीची वक्तव्ये केली गेली. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये चुकीचा मेसेज गेला. आता आम्ही तिघांनी एकत्र येऊन मनसे चित्रपट सेना, चित्रपट महामंडळांच्या प्रयत्नांतून हा वाद मिटवला आहे. आता आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. यापुढेही आम्ही एकत्रित काम करून मराठी रसिकांची सेवा करणार आहोत.