शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव व स्वीय्य सहाय्यक नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच अर्ज, निवेदन स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यालय येथे उपस्थित होते.
सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अनेक नागरिकांनी स्वीय्य सहाय्यक साहेबांना भेटून आपल्या विविध समस्या मांडल्या. स्वीय्य सहाय्यकांनी सर्व नागरिकांचे अर्ज व निवेदने स्वीकारून त्यांना उचित मार्गदर्शन केले व अनेकांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वस्त केले. शासनदरबारी रखडणारी अनेक कामे मुंबईला न जाताच जलदगतीने होत असल्याने सर्व नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवडचे शहर जिल्हा अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी स्वीय सहाय्यकांचे स्वागत केले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते .राजू मिसाळ,नगरसेवक नाना काटे, फझल शेख ,वैशालीताई काळभोर,डॉ.वैशाली घोडेकर, राहुल भोसले,विनोद नडे , पंकज भालेकर,शकुरला पठाण, वर्षा जगताप,पुष्पा शेळके,संगीता कोकणे,गंगा धेंडे, संतोष वाघेरे, अमोल भोईटे, रामेश्वर लाहोटी आदी, उपस्थित होते.