शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाने आणि वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाने देशात क्रांती झाली असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दापोडी चौकातील पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेंडगे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आगरवाल, संजय गोडांबे, गणेश आटोळे, संजय शेडगे, अनुप लुंकड तसेच फामिदा शेख, आयेशा अन्सारी आदी उपस्थित होत्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांच्या बलिदानाने, त्यागाने आणि देशभक्तीच्या प्रेरणेने देशाला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले त्यास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशासाठी सर्वस्व अर्पण करणा-या स्वातंत्र्यसैनिक, देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांनी भावी पिढीने देशभक्तीचा हा वारसा पुढे चालू ठेवावा असेही सांगितले.