शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड ची संचालक मंडळाची पंधरावी बैठक आज गुरुवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय, ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती.
कंपनीचे चेअरमन तथा अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर तथा संचालक उषा उर्फ माई ढोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्ष नेता तथा संचालक नामदेव ढाके, विरोधी पक्ष नेते तथा संचालक राजू मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पीएमपीएमएलचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण मिश्रा, सचिव ममता बात्रा, संचालक सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) राजन पाटील, सहमुख्य कार्यकारी अधिकारी (पॅन सिटी) निळकंठ पोमन, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सचिव चित्रा पवार, शहर अभियंता अशोक केळकर आदी उपस्थित होते.
सदर बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील एकूण 26 विषयांपैकी खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
- यामध्ये माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप पी एम पी एम एल यांच्याजागी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्ती झालेली असून, पीसीएससीएल चे अधिकृत संचालक म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
- 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाच्या अहवालास मंजुरी देण्यात आली.
- आर्थिक वर्ष 2021 – 22 पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे. केजीएन ॲड. असोसिएटस चार्टर्ड अकाउंटंट यांची नियुक्ती बाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली.
- आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेला अधीन राहून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रदीप कुमार भार्गव यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती बाबत चर्चा करून त्यांच्या नावास मान्यता देण्यात आली. भार्गव हे सध्या इतर संस्था कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे.
- तसेच आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेने अधीन राहून यशवंत श्रीपाद भावे यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती बाबत चर्चा करून मंजुरी देण्यात आली. भावे हे माजी अध्यक्ष गव्हर्मेंट ऑफ इंडिया, माजी चेअरमन इकॉनॉमिक रेग्यूरेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि सध्या उपाध्यक्ष असोसिएशन ऑफ चाईल्ड केअर इंडिया यासह इतर चार कंपन्यांची त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे.
- कंपनी अधिनियम 2013 कलम 177 अंतर्गत लेखापरीक्षण समितीच्या स्थापनेवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
- कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 178 अंतर्गत नामांकन आणि मोबदला समितीच्या घटनेवर चर्चा करून मान्यता देण्यात आली.
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट (RFP2 आणि RFP3) च्या वेगळ्या निविदा प्रक्रियेद्वारे विविध स्मार्ट घटकांना वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिकल इन्फ्रास्टक्चर तयार करण्यासाठी रु. 1.73 कोटी खर्चाची मंजुरी बैठकीत देण्यात आली.
- मे. टेक महिंद्रा कंपनीच्या विनंतीनुसार, त्यांनी नमूद केलेले बदलाबाबत 14 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर चर्चा करून मूळ निविदेतील अटी व करारनाम्यानुसार गुणवत्तेबाबत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- मे KPMG सल्लागार यांची फक्त GIS Enable ERP चे कामकाजासाठी पूर्णवेळ 5 व 2 तज्ञ सल्लागार नेमणूकी बाबत निर्णय घेण्यात आला.
- पिंपरी-चिंचवड शहरातील इंडिया सायकल ४ चेंज चॅलेंजसाठी टेक्निकल कन्सल्टंट/एनएमटी एक्स्पर्टची नेमणूक आणि रु. 20 लाख देयकांबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली.
- देवकर पार्क ते सांगवी एसटीपी पर्यंत वाढलेल्या इंटरसेप्टर लाईन बाबत चर्चा करून मंजुरी देण्यात आली.