शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी येत्या 13 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संघटनेची बैठक व 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्याचे ठरले असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
यासंबंधी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून येत्या 16 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आजम भाई पानसरे ,माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, माजी उपमहापौर मोहम्मदभाई पानसरे ,श्याम वालेकर , माजी नगरसेवक अतुल शितोळे ,गणेश शिंदे, श्रीरंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.