शबनम न्युज | सांगवी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सांगवी येथील निळू फुले नाटयगृह येथे सुरु करण्यात आलेल्या लसिकरण केंद्राचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विवेक थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर आदी उपस्थित होते.
Advertisement