शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पार्थ पवार फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राजसप्ताह चे आयोजन करण्यात आले त्यामध्ये
दिनांक २३ सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये कर्करोग,हृदयरोग,मोतीबिंदू यासारख्या शस्त्रक्रिया मोफत व ECG,MRI,X-RAY,2D-ECHO मोफत व अल्पदरात आयोजन करण्यात आले प्रभागातील असंख्य नागरिकांना त्यात लाभ घेतला.
दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता WALK FOR HELTH (वाॅकेथाॅन) चे आयोजन करण्यात आले व पोलिस कर्मचारी …….यांच्या वतीने योग प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. ११.०० वाजता आई उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले
दिनांक २५ सप्टेंबर रोजी मोफत दुचाकी PUC व नागरिकांना मोफत नवीन व दुरूस्त पॅनकार्ड योजना राबविण्यात आली.
दिनांक २६ सप्टेंबर रोजी सामाजिक बांधिलकी जपत सरस्वती अनाथ आश्रम येथील विद्यार्थ्यांना वही व छत्री वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे संचालकांकडून नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व पार्थ पवार फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करण्यात आले
दिनांक २७ सप्टेंबर रोजी प्रभागातील ६५ वय असलेल्या नागरिकांना मोफत ST पास देण्यात आले
याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे,स्वीकृत सदस्य संजय कणसे,अजय जाधव,सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कांबळे,पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष जन्नत सय्यद,प्रभाग अध्यक्ष फमिदा,पुष्पा शिंदे,जाफर शेख,प्रमोद गायकवाड,विजय कणसे,शाहिद कुरेशी,सचिन नहार,आकाश नाटेकर, निशांत कांबळे,सोमनाथ कामठे,सनी वाघमारे,शंकर गायकवाडविशाल गोपी,आकाश बोरवडे,मनोज गुंठे,आशिष जगताप,अंकुश वाघमारे,मिलिंद संकनुर उपस्थित होते