शबनम न्यूज | भोसरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवदुर्गा सखी मंच व पांडाभाऊ साने युवा मंचाच्या वतीने मोरेवस्ती-साने चौक परिसरातील नागरिकांसाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधून “घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१” चे आयोजन करण्यात आले होते.
Advertisement
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सर्व विजयी स्पर्धकांच्या घरी जाऊन पार पाडण्यात आला. विजयी स्पर्धकांना कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसीचे कागदपत्रे देखील देण्यात आले.
Advertisement
नवदुर्गा सखी मंचाच्या अध्यक्षा रुपालीताई पांडाभाऊ साने यांच्या हस्ते आणि नवदुर्गा सखी मंचाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सदर बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
स्पर्धेचा निकाल –
प्रथम क्रमांक- कु.स्नेहल जाधव
द्वितीय क्रमांक -सौ रुपाली धुमाळ
तृतीय क्रमांक -सौ वैशाली बावणकर
चतुर्थ क्रमांक -कु विक्रांत सोनटक्के
Advertisement
Advertisement