शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड / प्रतिनिधी
प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रास्त भाव रेशनिंग दुकानदारांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माहे मे व माहे जून तसेच त्याचे एक्सटेन्शन जुलैपर्यंत जे वाटप अन्नधान्याचे लाभार्थ्यांना केले त्याची रक्कम उपनियंत्रक शिधावाटप ,जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना अदा केली आहे तरी माझी राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांना विनंती आहे की आपण रीतसर अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे करावा व आपली मार्जिनची रक्कम आपण आपल्या ताब्यात घ्यावी ही आपणा सर्वांना ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोपकीपर फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी सूचना करीत आहे.असे आवाहन माजी खासदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी केले आहे.