शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान भाजप नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने नोकरी महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे
3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळी दरम्यान या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे तरुण बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा हा यामागचा उद्देश असल्याची नगरसेविका नम्रता लोंढे यांनी सांगितले
तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान डोळे तपासणी शिबिर तसेच सकाळी 11 ते दुपारी चार पर्यंत हृदयरोग तपासणी शिबिर ,सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत दातांची मोफत तपासणी,सकाळी नऊ ते दुपारी दोन रक्तदान शिबिर
तसेच 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन भव्य नोकरी महोत्सव, सकाळी दोन ते दुपारी तीन पर्यंत महिलांचा सन्मान तसेच सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक सन्मान तसेच सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत गौरी गणपती सजावट बक्षीस वितरण व त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तसेच नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे इंद्रायणी नगर आणि परिसराच्या विकासासाठी सामान्य नागरिकांना सहभागी करून घेता यावे लोकांच्या सूचना आणि कल्पनांचा अभ्यास करता यावा या हेतूने नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी आपले संकेतस्थळ विकसित केले आहे त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही नगरसेविका नम्रता लोंढे यांनी सांगितले