शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात मास्क न वापणाऱ्या आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या 9 लाख 87 हजार 609 कारवाई करून 29 सप्टेंबरअखेर 45 कोटी 22 लाख 74 हजार 493 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 27 कोटी 81 लाख 34 हजार 160, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात 6 कोटी 13 लाख 72 हजार 498 आणि पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात 11 कोटी 16 लाख 38 हजार 535 इतकी दंड रक्कम 22 सप्टेंबर अखेर वसूल करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात 23 ते 29 सप्टेंबर या कालावधीत कोरोना नियमांचे पालन न केल्याने 4 हजार 178 प्रकरणी कारवाई करून 15 कोटी 29 लाख 300 रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 लाख, 85 हजार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात 5 लाख, 96 हजार आणि पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात 7 लाख, 48 हजार 300 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीमार्फत या सर्व कारवाया करण्यात आल्या आहेत. मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करुन कोरोना नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.