शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संजय वाबळे यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Advertisement
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आपल्या देशाचे महापुरुष आपण त्यांची शिकवण अंगीकारली पाहिजे त्यांनी दाखविलेला अहिंसेचा मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे अशा शब्दात नगरसेवक संजय वाबळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले यावेळी त्यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व मित्रमंडळी उपस्थित होते