शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 19 लाख 41 हजार 428 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 93 हजार 813 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 226 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 159 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.37 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 39 हजार 438 रुग्णांपैकी 11 लाख 14 हजार 410 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार 206 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 822 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.80 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 48 हजार 412 रुग्णांपैकी 2 लाख 39 हजार 345 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 779 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 387 रुग्णांपैकी 1 लाख 95 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 218 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 984 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 382 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 456 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 638 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 194 रुग्णांपैकी 2 लाख 32 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 385 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 274 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 765, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 170, सांगली जिल्ह्यात 93 तर कोल्हापूर जिल्ह्यात 48 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 134 आहे. पुणे जिल्हयामध्ये 624, सातारा जिल्हयामध्ये 167, सोलापूर जिल्हयामध्ये 171, सांगली जिल्हयामध्ये 126 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 70 लाख 93 हजार 24 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 93 हजार 813 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.