शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड येथे भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभागाच्या वतीने सेवा समर्पण अभियान अंतर्गत नमो प्रश्न मंजुषा हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमाला भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष संकेत दादा चोंधे व योगेश बसुदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या जन्मदिनानिमित्त चालू असलेल्या “सेवा समर्पण अभियान” अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग यांनी अयोजीत केलेला नमो प्रश्नोत्तरी हा कार्यक्रम विक्रांत पाटील (प्रदेश अध्यक्ष भाजयुमो महाराष्ट्र राज्य),डाॅ अक्षय पाटील (प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी विभाग महाराष्ट्र राज्य),स्वप्निल काळे ( राज्य सहसंयोजक विद्यार्थी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोचिंग क्लासेस मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग पिंपरी चिंचवड शहर यांनी केले होते.
यावेळी दिगंबर भानुदास गुजर (जिल्हा संयोजक विद्यार्थी विभाग), सहसंयोजक सुहास आढाव, अजय मोरे, अनिकेत शेलार, आप्पा घोगरे, अनिकेत मातेरे, पंकज जांगिड, अक्षय मोरे, निखिल नवले, इतर पदाधिकारी उपस्थित होते.