शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गर्शनाखाली नवी सांगवी – काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल येथे साफसफाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षित तरुण ललित म्हसेकर यांनी स्वतःची सेफ्टी व रोड सेफ्टी विषयी जनजागृती केली.
यावेळी सर्व कर्मचारी वर्गाने या उपक्रमाचे खूप कौतुक केले. अशा प्रकारचा उपक्रम प्रथम आमच्या भागा मध्ये राबिण्यात आला आहे व अशा उच्च शिक्षित लोकांची आम्हला गरज आहे की ते आम्हाला एक घरातली सदस्य समजून आम्ही सुरक्षित कसे राहू शकतो व आम्ही त्या वर काय काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिके कडून कोणतेही मोबदला न घेता हा उपक्रम आमच्या साठी राबविला या कार्यक्रमातून आमची एका प्रकारची सेवा केली आहे अशीच लोकांची सेवा घडू या शुभेच्छा कर्मचारी वर्गाकडून देण्यात आल्या.
कार्यक्रमात सांगितलेले विषय…
१) कोविड सेफ्टी विषयी जन जागृती.
२) सेफ्टी अवरणेस (सेफ्टी विषयी जण जागृती)
३) रोड वर कचरा गोळा करत फिरणाऱ्या गाडी चालकांना रोड सेफ्टी, वेहिकल फिटनेस व कचरा गोळा करणाऱ्या कर्मचारी यांना कचरा गोळा करताना काय सेफ्टी वापरावी ही माहिती.
४) रोड साफ सफाई करणाऱ्या महीला वर्गाला स्वतःची सेफ्टी विषयी जन जागृती.
यावेळी ४० कर्मचारी सह आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य सहाय्यक दशरथ भांबरे,रवी रोकडे, सिद्धार्थ जगताप उपस्थित होते.
यावेळी ललित म्हसेकर म्हणाले, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, समाज्याच्या हितासाठी तळमळीने कार्य करायची इच्छा आहे. गेली सोळा वर्षापेक्षा अधीक कालावधी पासून मी छोट्या मोठ्या स्वरूपात समाजकार्य करत आहे. मी मेकॅनिकल-बि.टेक, व ADIS सेफ्टी ऑफिसर शिक्षण घेतले आहे या शिक्षणाचा उपयोग जास्तीत जास्त समाज हितासाठी कसा करतात येइल हे माझे कायम प्रयत्न आहेत. साफसफाई करणाऱ्या लोकांकडे कुणाचं ही कधी लक्ष नसते, कोणीही त्यांची काळजी घेण्यासाठी पुढे देखिल येत नाही, त्या कर्मचारी वर्गा ला सेफ्टी विषयी जन जागृती करुण त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मी समाज हिताचे समाजकार्य करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.