शबनम न्युज | पुणे
पुणे । प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने तसेच सदानंद शेट्टी मित्रपरिवार यांच्या कडून आज सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे.
करोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आजपासुन पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने प्रशांत जगताप व अंकुश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कॅन्टोन्मेंट येथे आबासाहेब आत्रे कनिष्ठ महाविद्यालय रास्ता पेठ एज्युकेशन शाळेच्या दालनात सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष सदानंद कृष्ण शेट्टी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ चे तसेच मास्क वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या कोरोना नंतरच्या शालेय पहिल्या दिवसाच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर धावडे महिला अध्यक्ष मीना पवार प्रभाग क्रमांक 16 च्या महिला अध्यक्ष नीता ताई गायकवाड पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे. शाळा सुरू झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला आहे.