शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाजी वाडी या परिसरात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत होता. त्यात महानगरपालिका प्रशासनाचा दिवस आड पाणी या धोरणामुळे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन छोट्या असल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा नागरिकांना तुटवडा भासत होता. ही सर्व बाब या परिसरातील विद्यमान नगरसेवक लक्ष्मण शेठ सस्ते यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या पिण्याच्या पाण्याच्या सुरळीत पुरवठा करिता पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
शिवाजी वाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन या मोठ्या स्वरूपातल्या टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शिवाजी वाडी परिसरातील नागरिकांना या नवीन पाईप लाईन मुळे पिण्याचे पाणी सुरळीत पणे मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधानी असून नगरसेवक लक्ष्मण शेठ सस्ते यांच्या प्रयत्नामुळे या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. या सर्व नागरिकांनी नगरसेवक लक्ष्मण शेठ सस्ते यांचे आभार व्यक्त केले.