शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ३० व्यक्तींचा सत्कार सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल,पिंपळे गुरव यांच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे आदी उपस्थित होते. ३० व्यक्तींचा सत्कार केलेल्यांमध्ये सुधीर गडलिंग, निलेश बोंबले, प्रीती परदेशी, सुदेश
गायकवाड, विजय टेपूगडे, मनीषा पाटील, प्रशांत वाघ, विजय सिंह भोसले, काळूराम लांडगे, अनिल लोखंडे लोकेश वारके, जितेंद्र गरगटे, नंदा अहिरे, संतोष महामुनी, सुनीता लोखंडे, डॉ. ओंकार अनंतराव, भारती परदेशी, सुधा खोले, मनीषा जाधव, सतीश परदेशी, महेश नलावडे, संतोष म्हात्रे, बलभीम भोसले, राजू पोखर्णिकर, केदार काटे, प्रफुल्ल कोठारी, रमेश मोरे, राहुल धोत्रे, अदिती निकम, रोहिदास बो-हाडे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे यांनी केले.