नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेश लांडगे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली त्यांनी नम्रता योगेश लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्या करत असलेल्या प्रभागातील विकास कामांचे कौतुक केले, प्रभागाच्या विकासात प्रभावीपणे काम करण्याची धमक नगरसेविका नम्रता योगेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्यात आहे या शब्दात आमदार महेश लांडगे यांनी नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या कार्याचे कौतुक केले.
महा आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न
नगरसेविका सौ नम्रता योगेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले नगरसेविका नम्रता लोंढे या पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात त्या आपल्या प्रभागात करीत असलेल्या विकास कामां मुळे नेहमीच चर्चेत असतात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम त्या नेहमीच राबवित असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी प्रभागातील नागरिकांसाठी डोळे तपासणी शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले तसेच हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांसाठी दातांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली या आरोग्य शिबिरास प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला दुपारपर्यंत 450 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे हे जातीने उपस्थित होते तसेच प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी नगरसेविका नम्रता लोंढे या स्वतः हजर राहून जातीने लक्ष देत होते तसेच येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करीत होत्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमांची चर्चा संपूर्ण प्रभागात होत आहे त्यांना यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक महिलांनी हजेरी लावली.
भव्य नोकरी महोत्सव संपन्न
नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त ०३ ऑक्टोबर रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, या नोकरी महोत्सवात पिंपरी-चिंचवड शहरातील 29 कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कंपन्यांच्या सहभागाने सदरचे नोकरी महोत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले.
सध्या कोरोना काळाच्या संकटमय समय अनेक युवक युवतींच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली या युवक-युवतींना या नोकरी महोत्सवाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे या नोकरी महोत्सवात 980 उमेदवारांनी हजेरी लावली या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या उमेदवारांमधून एकूण 500 बेरोजगार युवक-युवतींना यामध्ये नोकरी मिळाली अशी आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली.
या नोकरी महोत्सव दरम्यान नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी स्वतः जातीने हजर राहून सर्व प्रक्रियांचै निरीक्षण केले तसेच या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरी मिळाली पाहिजे याच उद्देशाने आपण हे नोकरी महोत्सव आयोजित केले असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. या नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळाल्याने त्यांनी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचे आभार व्यक्त केले.
भव्य रक्तदान शिबीर
तसेच नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या वेळी करण्यात आले सध्या कोरोना संकट काळात रक्ताचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच आपल्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात भासला होता पुढील भविष्यकाळात असा रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता जास्तीत जास्त रक्तदान झाले पाहिजे या दृष्टिकोनातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरांमध्ये अनेक युवकांनी आपले रक्तदान केले या रक्तदात्यांना नगरसेविका नम्रता योगेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रभाग विकास करिता संकेतस्थळाचे लोकार्पण
नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त संकेतस्थळाचे लोकार्पण या वेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले इंदरयानी नगर आणि परिसराच्या विकासासाठी सामान्य नागरिकांना सहभागी करून घेता यावे लोकांच्या सूचना आणि कल्पनांचा अभ्यास करता यावा या हेतूने नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी आपले संकेतस्थळ विकसित केले आहे त्याचे लोकार्पण या वेळी करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सन्मान तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.
नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आमदार महेश लांडगे यांच्या सह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, भाजप नेते अमित गोरखे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे ,नगरसेविका सोनाली गव्हाणे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे ,आदी मान्यवरांनी हजेरी लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.