शबनम न्यूज | पुणे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेशहर आणि पुणे कँटोमेन्ट विधानसभा मतदार संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात “घरगुती गॅस” सिलेंडर,पेट्रोल,डिझेल दरवाढी निषेर्धात पुना कॉलेज येथील भारत गॅस एजन्सी समोर भव्य आंदोलन करण्यात आले
यावेळी रस्त्यावर चूल पेटवून तसेच गॅस सिलेंडरचे प्रतिकात्मक श्राद्ध घालुन केंद्र सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आला. तसेच आंदोलनात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपल्या भाषणातून रोष व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा.प्रशांतदादा जगताप महिला शहराध्यक्ष मा.मृणालीताई वाणी पुणे कँटोमेन्ट विधानसभा निरीक्षक मा.रवींद्रअण्णा माळवदकर, पुणे कँटोमेन्ट विधानसभा अध्यक्ष मा.आनंद सवाणे पुणे कँटोमेन्ट महिला अध्यक्षा मा.मीनाताई पवार तसेच विविध प्रभागाचे नगरसेवक तसेच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि पुणेशहर चिटणीस जुबेर बाबु शेख सामाजिक कार्यकर्त्या मा.दिलशाद जुबेर शेख आणि जुबेर बाबु शेख मित्र मंडळाचे असंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.