शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील कार्यक्षम महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करिश्मा सनी बारणे व अखिल थेरगाव युवा मंच यांनी आयोजित केलेल्या गौरी-गणपती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नुकतेच पार पडले. सदर बक्षीस नगरसेवक अभिषेक बारणे व भाजपा शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे यांचे हस्ते देण्यात आले.
या बक्षीस वितरण समारंभ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सौ शोभा टिंगरे यांना देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सौ गौरी संतोष लोणकर यांना तर तृतीय क्रमांक बक्षीस ज्योती शिंदे व सिद्धी बोरगे यांना विभागून देण्यात आले तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अक्षय श्रीकांत वाघोले व हिंदवी जगताप यांना विभागून देण्यात आले तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस प्रियंका शरद मोरे व नम्रता नंदकुमार कुलकर्णी यांना विभागून देण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बारणे, ह भ प भानुदास गुजर, ह-भ-प सोपानराव घोटकुले आदी मान्यवर उपस्थित होते.