सोमवार पासून सुरु होणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्येच लसीकरण सोय उपलब्ध करुन द्या- नगरसेविका प्रियांका बारसे यांची आयुक्तांकडे मागणी
शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
सोमवार पासून सुरु होणाऱ्या महाविद्यालयांच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका बारसे यांनी आयुक्तांकडे निवेदन दिलेले असून दिलेल्या निवेदनात त्या म्हणतात,पिंपरी-चिंचवड शहरातील covid-19 च्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरता कोविड लसीकरण मोहीम आपल्या पिंपरी चिंचवड शहरात प्रभावीपणे राबविली जात आहे.
पण कधीकधी तरुणाईच्या हलगर्जीपणामुळे – दुर्लक्षामुळे ही लस उपलब्ध असूनही ती घेतली जात नाही .त्यातच पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार ११ ऑक्टोबर पासून सर्व महाविद्यालय सुरू होणार आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
आपण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण चे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे अशी अट परिपत्रकात टाकलेली आहे तथापि विद्यार्थ्यांसाठी मात्र अशी कोणतीही अट आपण टाकलेली नाही किमान लसीचा एक डोस तरी विद्यार्थ्यांनी घेतलेला असणे आणि त्या वेळेसच महाविद्यालयांमध्ये त्यांना प्रवेश असणे बंधनकारक केले तर कोरोना प्रादुर्भाव वाढीस प्रतिबंध राहणार आहे.
हे लक्षात घेऊन च पिंपरी-चिंचवड शहरांमधील कॉलेजमध्ये लसीकरणाची मोहीम राबवण्याची मागणी नगरसेविका बारसे यांनी केली आहे.