शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या विरोधात लखीमपूर खिरी येथे रविवारी सुरू असलेल्या शांतीपूर्ण निदर्शनाच्या वेळी BJP मोदी सरकार च्या केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने आपल्या कारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर कार चालवत चिरडून अन्नदाता शेतकऱ्यांची हत्या केली. शांततेने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला. त्याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. आज दापोडीतील भाजीवाले,दुकानदार व व्यवससायिक पथविक्रेते त्यानुसार आज दापोडी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद या आवाहनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांच्या मार्गदर्शनात सदरचे आवाहन दापोडी परिसरातील व्यावसायिकांना करण्यात आले.