शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
गवळीनगर प्रभागात पर्यावरण विभागाकडून चालु असलेल्या STP प्लान ची पाहणी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी पाहणी केली. STP प्रकल्प म्हणजे ड्रेनेजचे पाणी शुद्ध करून ते गार्डनिंग बांधकामा साठी वापरता येईल किंवा इतर कामासाठी वापरण्यायोग्य करणे या प्रकल्पात दर दिवसाला सात एमएलडी पाणी शुद्धीकरण होण्याची क्षमता आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. याबद्दल माहिती देताना समक्ष जलनिस्सारण विभागाचे वायकर साहेब तसेच स्थापत्य विभागाचे पांचाळ साहेब तर एसटीपी प्रकल्पाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी फोनवरून याबाबत माहिती दिली.
मनपाने या प्रकल्पासाठी पाच कोटींची तरतुद केली आहे.nअसे STP प्लान जागेच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रभागात व्हावेत असे नगरसेविका बारसे म्हणाल्या.
जर झाले तर जलनिस्सारण विभागाचे या प्रभागातुन त्या प्रभागात पाणी वाहून नेण्यासाठी खर्ची पडणारा पैसा वाचणार आहे तसेच त्या त्या प्रभागातील पाणी त्या त्या प्रभागाच वापरले गेले तर प्रभागासाठी ते विकासाचे काम करणार आहे.
हे पाणी प्रभागातल्या या उद्यानांना तसेच प्रभागात चालू असलेल्या बांधकामांना सुद्धा वापरणे सोयीचे ठरणार आहे असे मत नगरसेविका प्रियांका बारसे यांनी मांडले.